फोटो तरूणीचा, कॉलगर्ल म्हणून फोन आईला

'मी कॉल गर्ल आहे', असं एका मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं होतं. या मुलीच्या फेसबुक वॉलवर नंबरही लिहिण्यात आला होता. मात्र हा नंबर तिच्या आईचा होता, या मुलीच्या आईला फोन येऊ लागले. एवढंच नाही या अकाऊंटवरून, या मुलीच्या नातेवाईकांनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या.

Updated: Dec 8, 2015, 05:40 PM IST
फोटो तरूणीचा, कॉलगर्ल म्हणून फोन आईला title=

मुंबई : 'मी कॉल गर्ल आहे', असं एका मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं होतं. या मुलीच्या फेसबुक वॉलवर नंबरही लिहिण्यात आला होता. मात्र हा नंबर तिच्या आईचा होता, या मुलीच्या आईला फोन येऊ लागले. एवढंच नाही या अकाऊंटवरून, या मुलीच्या नातेवाईकांनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या.

यानंतर पोलिसात संबंधित मुलीने आणि आईने तक्रार केली, चौकशीवरून लक्षात आले, मुलीच्या नावाने वसिम नावाच्या व्यक्तीने बनावट अकाऊंट तयार केले होते. २२ वर्षाच्या वसिमला मुंबईतील गोरेगावमधून अटक करण्यात आली आहे.

फेसबुकवर 'कॉल गर्ल'चा मोबाइल नंबर अपडेट असल्याने मुलीच्या आईला वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात अश्लील कॉल येण्यास सुरूवात झाली.  अखेर मुलीच्या पालकांनी याची तक्रार सायबर क्राईमकडे केल्याने पोलिसांनी अकाउंटसाठी वापरण्यात आलेल्या नंबरला ट्रेस करून वसीम खानला अटक केले.

वसीमने जुलैमध्ये बनावट अकाउंट सुरू केले, तसेच अज्ञात व्यक्तीसोबत चॅटींग करायला सुरूवात केली. मुलीच्या फोटोत फेरफार करून तो फोटो अश्लील केला. चॅटींग करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी मुलीच्या आईचा मोबाईल नंबर फेसबुकवर शेअर केला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.