एल्फिन्स्टन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावात बदल

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन  आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन स्टेशन्सची नावे बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2017, 09:17 PM IST
एल्फिन्स्टन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावात बदल title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन  आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन स्टेशन्सची नावे बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय. 

एल्फिन्स्टन स्टेशनचं नाव प्रभादेवी होणार आहे तर छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी १९९१ मध्ये केंद्राकडे पाठवला होता. 

केंद्र शासनाने गृहविभागाने रेल्वे स्थानकांची नावे बदल करण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. 

पश्चिम रेल्वेवरील स्थानकाला एलफिन्स्टन रोड हे नाव लॉर्ड एलफिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आले होते. ते १८५३ ते १८६० या काळात 'गव्हर्नर ऑफ बॉम्बे' होते. 

मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' असं करण्यात आले होते. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा या स्थानकाचे नाव बदलणार असून आता 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असं नामकरण होणार आहे.