मारियांची नियुक्ती कशी केली?, आयोगाचा सवाल

तरीही मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती का करण्यात आली?, असा सवाल निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केला आहे.

Updated: Mar 5, 2014, 04:28 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, मुंबई
निवडणूक आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या नियुक्तीवर निवडणूक आयोगाने प्रश्न चिन्हं लावलं आहे.
मुंबई हे राकेश मारिया यांचं जन्म ठिकाण आहे, ते मुंबईचे रहिवासी आहेत.
तरीही मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती का करण्यात आली?, असा सवाल निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात
निवडणुकीच्या तोंडावर मारिया यांची मुंबईतील नियुक्तीला आक्षेप
मुंबईचे रहिवाशी असलेल्या मारिया यांच्या मुंबईतील नियुक्तीलाच आक्षेप
यासंदर्भात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
तक्रार प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडून मागितले स्पष्टीकरण
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेल्या राकेश मारिया यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आचारसंहितेच्या नियमानुसार निवडणुकीच्या आधी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याची बदली त्याच्या मूळ गावी करता येत नाही.
राकेश मारिया हे मुंबईतील रहिवाशी असून सरकारने त्यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी नुकतीच केली आहे.
मारिया यांच्या या नियुक्तीला आक्षेप घेत त्यासंदर्भातील तक्रार राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागवले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.