मुंबई : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला टोला लगावला. सत्ताधारी बदलल्यानंतर जुन्या सरकारी योजनांची नावे बदलणे बरे नाही. या कृतीतून फारच आकस दिसतो, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
खडसे याबाबतीत आणखी बोलतांना म्हणाले, गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या राज्यातील राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवनदायी आरोग्य योजना असे करण्याचा प्रस्ताव अद्याप सरकारकडे आलेला नाही.
मात्र दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी, नव्या सरकारच्या काही योजना नव्या असल्यामुळे त्यांना दीनदयाळ उपाध्याय अथवा प्रमोद महाजन यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे खडसे यांनी समर्थन केले.
तत्कालीन राजवटीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांच्या नावाने सुरू झालेल्या योजना आजही चालू असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
राजकीय मतभेद असले, तरी त्या नेत्यांचे सामाजिक-राजकीय कार्य मान्य करावेच लागेल. जुन्या योजनेचे नामकरण करणे आपणास योग्य वाटत नाही. अर्थात, याबाबत मंत्रिमंडळात विषय आल्यानंतर सामूहिक निर्णय घेतला जाईल,' असंही खडसेंनी स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.