मुंबई : 'एखाद्याला आवडत नसेल तर त्यानं शांत बसावं आणि तेही जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं' अशा शेलक्या शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कानपिचक्या दिल्यात.
सत्तेत राहून सरकारवरच टीका करायची हे कोणतं धोरण, असा सवालही खडसेंनी सेनेला विचारलाय. संसार करायचा असेल तर तो दोघांनीही नीट करायचा असतो, अशा शब्दांत खडसेंनी सेनेला सुखी संसाराची सूत्रंही समजावली आहेत.
नुकतंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात दोन कार्यक्रम पार पडले. पण, या कार्यक्रमांना सेनेचा कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता. सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे हेदेखील या कार्यक्रमांपासून दूरच राहिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.