शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षण संघटनेचं प्रस्तावित आंदोलन मागे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेचं २ फेब्रुवारीचं आंदोलन मागे घेतलं गेलंय.

Updated: Jan 30, 2015, 06:49 PM IST
शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षण संघटनेचं प्रस्तावित आंदोलन मागे title=

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेचं २ फेब्रुवारीचं आंदोलन मागे घेतलं गेलंय.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेच्या सर्व मागण्या आणि समस्या आपण समजवून घेतल्या असून या संदर्भात अभ्यास करून आणि संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी दिलंय. या आश्वासनानंतर संघटनेच्या समन्वय समितीनं आपल्या मागण्यासाठी पुकारलेला येत्या २ फेब्रुवारीचा प्रस्तावित बंद मागे घेतला आहे.

समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री श्री. तावडे यांनी केलेल्या आवाहनानंतर आपलं प्रस्तावित बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.