ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक

महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 

Updated: Apr 22, 2015, 05:37 PM IST
ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक title=

मुंबई: महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 
 
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल असलेल्या धर्मराज काळोखेला ड्रगतस्करी प्रकरणी याआधीच अटक झालीय. त्याची साथीदार असलेल्या बेबी पाटणकरला पोलीस कित्येक दिवसांपासून शोधत होते. अखेर तिला अटक झालीय. 
 
किला कोर्टात तिला हजर केलं असता 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

कोण आहे ही बेबी पाटणकर आणि किती आहे तिची संपत्ती पाहा...

नाव - शशिकला उर्फ बेबी रमेश पाटणकर
वय - ५० वर्षे
काम - अंमली पदार्थांची तस्करी

बेबी पाटणकरची महाराष्ट्रातली संपत्तीच चक्रावून टाकणारी आहे. 

वरळी सिद्धार्थ नगर येथे २४ खोल्यांचे घर

मुंबई, नवी मुंबई येथे बेनामी फ्लॅटस्

रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, सावंतवाडीत घरे आणि जागा

एक स्विफ्ट गाडी, एक टाटा मांझा गाडी

दोन टू व्हिलर आणि बेनामी महागड्या गाड्या

बेबीच्या अकाऊंटमध्ये सापडले ९७ लाख रुपये

ही झाली राज्यात जमवलेली माया... त्याशिवाय आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गोव्यातही बेबीची करोडोंची मालमत्ता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.