मुंबई : देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे.
याबाबतची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २९ ऑक्टोबर रोजी केली होती. त्याची अमंलबजावणी येत्या रविवारपासून होणार आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
ही गाडी आठवड्यातून तीन वेळा चालविण्यात येणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे या गाडीचे वार असणार आहेत.
येत्या रविवारी सुरेश प्रभू एसी डबल डेकर एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही डबल डेकर दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. तर मडगावहून प्रत्येक मंगळवारी, गुरूवारी आणि शनिवारी सकाळी 6 वाजता सुटेल. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकांवर ही डबल डेकर थांबेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.