संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई

संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2013, 10:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
पुण्यातले डॉक्टर काही वेळातच विजयकुमार गावित यांची भेट घेणार आहेत. दरम्यान उद्या दुपारपर्यंत डॉक्टरांना संप मागे घेण्याची मुदत देण्यात आलीय. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाईला सुरूवात करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलंय.
मार्डचा संप सलग तिस-या दिवशी सुरुच आहे. संप मागे घेण्याबाबत मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही मार्डच संपाबाबत ठाम आहे... सलग तिस-या दिवशी संप सुरु असल्यानं रुग्णांचे मात्र हाल होतायत... रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलबाहेर समांतर ओपीडी सुरु करण्यात आलीय.

उपचारासाठी येणा-या रुग्णांवर या ओपीडीमध्ये उपचार करण्यात येतायत... तर दुसरीकडे सरकारनं आंदोलक डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारलाय. निवासी डॉक्टरांना देण्यात आलेली वसतीगृहं सोडण्यास सांगितलयं. तर मेस्मांतर्गत कारवाई केली तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागं घेणार नाही अशी आडमुठी भूमिका डॉक्टरांनी घेतलीये.
दरम्यान मार्डच्या संपात जे.जे.हॉस्पिटलचे साडेचारशे डॉक्टर्सही सहभागी झालेत... मुंबईतले एकूण अडीच हजार डॉक्टर या संपात सहभागी झाल्यानं हाल इथले संपत नाही असं म्हणण्याची वेळ रुग्णांवर आलीय..