डान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी

राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.

Updated: Nov 26, 2015, 05:27 PM IST
डान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी title=

मुंबई : राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात डान्सबार बंदीच्या कायद्याच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळून लावली. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडघसी पडलेय. 

डान्यबारला आमचा विरोधच : मुख्यमंत्री

राज्य सरकारचा अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर  फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे, पण राज्यात डान्सबार पुन्हा सुरू व्हावेत याला आमचा तत्वत: विरोध आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.