मुंबईत रक्तपात घडविण्याचा दाऊदचा डाव?

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम लवकरच मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नात आहे... दाऊद अजून निवृत्त झालेला नाही... हा संदेश भारताला आणि जगाला देण्यासाठी दाऊदनं काय खतरनाक प्लान आखलाय? पाहूयात हा खास रिपोर्ट...

Updated: Jan 19, 2016, 09:04 PM IST
मुंबईत रक्तपात घडविण्याचा दाऊदचा डाव? title=

राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम लवकरच मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नात आहे... दाऊद अजून निवृत्त झालेला नाही... हा संदेश भारताला आणि जगाला देण्यासाठी दाऊदनं काय खतरनाक प्लान आखलाय? पाहूयात हा खास रिपोर्ट...

झी मीडियाला सूत्रांनी माहिती दिलीय की, माफिया डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा घातपाती कारवाया घडवण्यासाठी सज्ज झालाय. जे 1993 साली जमलं नाही, ते 2016 मध्ये घडवण्याचा दाऊदचा प्लान आहे. दंगली भडकावण्याचा कट सध्या तो रचतोय... होय, धर्माच्या नावावर रक्तपात घडवण्याचा खतरनाक कट...

गुप्तचर यंत्रणांनी काही फोन कॉल्स इंटरसेप्ट केलेत. त्यामध्ये दाऊदचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील या घातपाती कारवायांची माहिती देतोय. काही लोकांना दंगली घडवण्याचं फर्मान सोडतोय. मुंबईत जाती आणि धर्माच्या नावावर दंगली भडकावण्याचा दाऊदचा खटाटोप आहे. याकामी डी कंपनीला पाकिस्तानी गुप्तचर संघटना, आयएसआयची मदत मिळण्याची शक्यता आहे.

अलिकडेच झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या घटना आणि दाऊदचा हा नवा प्लान यामध्ये काही ना काही संबंध असल्याची शक्यताही जाणकार व्यक्त करतायत...

ही कटकारस्थानं रचण्यामागे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा दाऊदचा डाव दिसतोय...

1) गेल्या काही वर्षांत दाऊदची पकड ढिली पडत चाललीय... ती ताकद पुन्हा आजमावण्याचा प्रयत्न दाऊद करतोय.

2) जगभरात दहशतवादाविरोधात मोहीम उघडणारे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला मोठा धक्का देऊन सरकार अस्थिर बनवण्याचा हा खटाटोप दिसतोय.