लावणी शिकायला गेली महिला डान्स टीचर म्हटला तू थांब आणि....

 गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम मुंबईतील एका गुरूने केले आहे. विद्यार्थीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. 

Updated: May 23, 2016, 05:03 PM IST
लावणी शिकायला गेली महिला डान्स टीचर म्हटला तू थांब आणि.... title=

मुंबई :  गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम मुंबईतील एका गुरूने केले आहे. विद्यार्थीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. 

मुंबईतील वर्सोवा येथे डान्स शिकण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप शिक्षकावर लावण्यात आला आहे. 

काय केलं शिक्षकाने... 

क्लास संपल्यानंतर महिला घरी जात होती त्यावेळी शिक्षक मनीष सप्तते याने सांगितले काही स्पेशल मूव्ह्स सांगणार आहे. त्यामुळे तू थांबून जा. त्यानुसार महिला थांबली मग मनीष सप्तते त्या महिलेला एकटी पाहून छेडछाड केली.  मनीष सप्तते वर्सोवामध्ये डान्स क्लास चालवतो. 

महिला आहे मुलांची आई 

तक्रार दाखल करणारी महिला लावणी शिकायला जात होती. शिक्षक आणि महिलेचे वय ४० वर्ष आहे. दोघांचे लग्न झाले आहे. आणि त्यांना मुलंही आहेत. 

वाईट पद्धतीने स्पर्श

महिलेला क्लासनंतर थांबविल्यावर त्याने तिला काही मूव्ह शिकविण्यास सुरूवात केली पण असे करतांना तिच्या कमरेभोवती आणि खासगी अंगाना वाईट पद्धतीने स्पर्श करू लागला. यापूर्वीही त्याने असे करण्याचा प्रयत्न केला होता. पण तीने दुर्लक्ष केले. 

पोलिसांनी केले अटक 

महिला खूप घाबरलेली होती. तीने क्लासला न जाण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या तक्रारीवरून शिक्षकाला अटक करण्यात आली.