'डान्स बिफोर यू वर्क'... आणि धम्माल मूडमध्ये करा कामाला सुरुवात!

सध्या मुंबईतल्या काही ऑफिसमध्ये एक नवा ट्रेंड दाखल होतोय... तो म्हणजे, ऑफिसमध्ये कामाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं सगळ्यांसोबत मिळून पहिली पाच मिनिटं एखाद्या गाण्यावर डान्स करायचा आणि मगच करायची कामाला सुरूवात... आहे की नाही धम्माल आयडिया... 

Updated: Oct 6, 2015, 10:09 PM IST
'डान्स बिफोर यू वर्क'... आणि धम्माल मूडमध्ये करा कामाला सुरुवात! title=

मुंबई : सध्या मुंबईतल्या काही ऑफिसमध्ये एक नवा ट्रेंड दाखल होतोय... तो म्हणजे, ऑफिसमध्ये कामाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं सगळ्यांसोबत मिळून पहिली पाच मिनिटं एखाद्या गाण्यावर डान्स करायचा आणि मगच करायची कामाला सुरूवात... आहे की नाही धम्माल आयडिया... 

'डान्स बिफोर यू वर्क' असं या नव्या कॉर्पोरेट संस्कृतीचं नाव... सगळ्यांनी आपल्या दिवसाची मस्त आणि धम्माल सुरुवात करावी आणि मग एकदम फ्रेश मूडमध्ये कामाला सुरुवात करावी... असा यामागचा उद्देश... 

'अॅक्सेन्चर' या कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयातही ही कॉर्पोरेट संस्कृती दिसतेय. याच कंपनीतला एक व्हिडिओही सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. 

हा व्हिडिओ आत्तापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलाय तर ८७,६८० लोकांनी शेअर केलाय.

 

From Accenture Mumbai.. They Dance Daily 5 minutes before they start their Work.. !! :)

Posted by Ashutosh Mehta on Friday, August 14, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.