दहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय?

राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.

Updated: Aug 12, 2014, 04:57 PM IST
दहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय? title=

मुंबई : राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.

राज्यात यापुढे कुठेही 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये आणि 18 वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकांत घेऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे अऩेक मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. तशी अप्रत्यक्ष भूमिका घेतली आहे. अटी असतील तर आम्ही उत्सव साजरा करणार नाही. तर काहींनी यातून माघार घेतली आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मोठमोठ्या रकमांची बक्षिसे लावून उंचच उंच दहीहंड्या बांधल्या जातात. रात्री उशिरापर्यंत वाजत-गाजत त्या फोडल्या जातात. त्याचे थेट प्रक्षेपणही वृत्तवाहिन्यांवरून होते. यंदा हा जल्लोष नसणार हे स्पष्ट झालेय.

उत्सवाच्या नावाखाली लहान मुलांना उंचच उंच मनोऱ्यावर चढविणे योग्य आहे का?, न्यायालयाने घातलेल्या बंदीचे तुम्ही कसे समर्थन करता. तसेच गोपाळकाला मंडळांनी घेतलेली भूमिका तुम्हीला योग्य वाटते काय, याबाबच आपली काय भूमिका आहे, हे आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिसू दे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.