Dabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे!

गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. 

Updated: Jul 23, 2015, 04:45 PM IST
Dabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे! title=

मुंबई : गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. 

सध्या डबेवाल्यांचा टेक्नॉलॉजीचा वापर शून्य आहे. पारंपरिक पद्धतीनं ते आजही डबे पोहचवण्याचं काम करत आहेत. पण, काळाची गरज ओळखून आणि सध्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपला व्यावसाय पुढे न्यायचा निर्धार आता डबेवाल्यांनी केलाय. म्हणूनच हा डबेवाला आता ऑनलाईन सेवेतही दाखल होतोय. 

मुंबईकरांनाही या 'ऑनलाईन डबेवाल्याची' उत्सुकता लागलीय. या ग्राहकांसाठी dabewale.Com ही वेबसाईट बनवण्यात आलीय. येत्या आषाढी एकादशीला म्हणजेच 27 जुलै रोजी या वेबसाईटचं उद्घाटन होणार आहे. या दिवसापासून डबेवाल्यांची ऑनलाईन सेवा सुरू होईल. 

कसा मागवाल डबा?
- एखाद्या ग्राहकाला डब्याची सेवा हवी असल्यास त्यानं dabewale.com या वेबसाईटला भेट द्यावी.

- या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर, गल्लीत, विभागात किंवा इमारतीत कोणता डबेवाला येतो याची माहिती मिळेल... या डबेवाल्यांचा संपर्क क्रमांकही तुम्हाला इथे मिळेल.  

- यानंतर इच्छुक ग्राहकाची माहिती घेतल्यानंतर त्या ग्राहकाला डबा पोहचवण्याची सेवा दिली जाईल.

हे क्षेत्र डबेवाल्यांनसाठी नवीन आहे... तेव्हा कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचं आहे. मी स्वत: पदवीधर असल्यानं थोडंफार ऑनलाईनचं ज्ञान असल्यामुळे ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला डबेवाल्यांनाही त्याचा फायदा होईल, असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे सरचिटणीस सुभाष तळेकर यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.