झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल

सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे. 

Updated: Aug 12, 2014, 11:58 PM IST
झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल title=

मुंबई : सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे. 

CST स्थानकावरील रि फ्रेश फुड स्टॉल हा अखेर बंद करण्यात आला आहे. झी मीडियाच्या प्रतिनिधिला ग्लास मध्ये दिल्या जाणा-या शीतपयामध्ये झुरळ आढळून आलं होते. याची तक्रार संबंधित रेल्वे प्रशासनाकडे ई मेल द्वारे शीतपेयाच्या फोटोसकट केली होती. त्या फूड स्टॉलच्या अस्वच्छ्तेसंदर्भात या आधीही काही तक्रारी प्रवाशानी केल्या होत्या. 

या संदर्भात बातमी दाखवल्यावर रेल्वेच्या आयआरसीटीसी या खान पान सेवा देणा-या विभागाने कारवाई करत CST वरील तो रि फ्रेश फूड स्टाल अखेर बंद केला आहे.

सीएसटीसारख्या भारतातील एका मुख्य रेल्वे स्थानकावर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या रेल्वे स्थानकांवर काय स्वच्छता ठेवली जात असेल याची कल्पनाही न केलेली बरी. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थ घेतांना प्रवाशांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.