सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग

मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

Updated: Jun 27, 2014, 06:26 PM IST
सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग title=
cst building fire

मुंबई  : मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास भीषण आग लागली.

या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

सीएसटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला ही इमारत असून आग कशामुळे लागली हे आताच कळू शकले नाही. 

या आगीत किती हानी झाली या बाबतही माहिती मिळालेली नाही. दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.