मुंबई : महापालिकेत केलेल्या कामांवरून आणि त्याचं क्रेडीट घेण्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसंगावधान राखलं आणि वाद मिटवला.
श्रेयवादावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. मुंबईतील माटुंग्यात एका उद्यानाचं उद्घाटन होतं. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांची उपस्थिती होत्या.
उद्यानाचं उद्घाटन झाल्यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरु झाला. काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांनी भाषणाला सुरुवात केली आणि आपल्याच प्रयत्नानं हे उद्यान सुरु झाल्याचं सांगितलं.
नयना शेठ एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचायला सुरुवात केला. त्यामुळं समोर बसलेले शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी शिवसेनेच्या समर्थनात घोषणाबाजी केली. त्यानंतर गोंधळ सुरु झाला. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसंगावधान राखून वेळीच माईकचा ताबा घेतला आणि गोंधळावर पडदा टाकला.
उद्धव ठाकरेंच्या या प्रसंगावधानामुळे शिवसैनिक तर शांत झालेच पण काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ जरा शांतच झाल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.