मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जवखेडा हत्याकांड तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार चर्चा करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर अजित पवार आणि फडणवीस यांच्यात ही पहिलीच चर्चा असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात तसेच मराठवाड्याच्या काही भागात दुष्काळाची स्थिती भयावह असल्याचं सांगण्यात येत आहे. कापसाला यावर्षी कमी भाव आहे, यावरही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.