मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. या हाणामारीला निमित्त ठरलाय काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींचा नियोजित महाराष्ट्र दौरा.
मुंबईतल्या नेमक्या कुठल्या भागात हा दौरा घ्यायचा, यावरून काँग्रेसच्या दोन गटात मतभेद असल्याचं समोर येतंय. काँग्रेसचे दोन दिग्गज नेते नसीम खान आणि अस्लम शेख यांच्यात या विषयावरून चांगलीच हमरीतुमरी झाली.
त्यानंतर या दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या बैठकीला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, प्रिया दत्त, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड असे दिग्गज नेते हजर होते. या प्रकारामुळं काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झालीय.