मुंबई महापालिकेत तिसऱ्या दिवशी राडा

मुंबई महापालिकेचे सभागृह सलग तिस-या दिवशी नगरसेवकांनी घोषणाबाजी आणि गोंधळानं दणाणून सोडलं. काँग्रेसच्या निलंबित नगरसेविका सभागृहात येवू नये यासाठी सत्ताधा-यांनी महिला सुरक्षारक्षकांची मोठी फौज सभागृहाबाहेर लावली होती.

Updated: Mar 12, 2015, 09:11 PM IST
मुंबई महापालिकेत तिसऱ्या दिवशी राडा title=

मुंबई : मुंबई महापालिकेचे सभागृह सलग तिस-या दिवशी नगरसेवकांनी घोषणाबाजी आणि गोंधळानं दणाणून सोडलं. काँग्रेसच्या निलंबित नगरसेविका सभागृहात येवू नये यासाठी सत्ताधा-यांनी महिला सुरक्षारक्षकांची मोठी फौज सभागृहाबाहेर लावली होती.

निलंबन मागे घेण्यासाठी सकाळी महापौरांच्या केबिनबाहेर काँग्रेस नगरसेवकांनी राडा केला. त्यानंतर गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांनी निलंबन  मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करूनही निलंबन मागे न घेतल्यानं निलंबित नगरसेविकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी नगरसेवकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय.

तर काही  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मास्क घालून महापौरांच्या केबिनबाहेर घोषणाबाजी केली. सर्वच राजकीय पक्षांनी नंतर सभागृहबाहेरच्या राड्याचा निषेध व्यक्त केला. तसंच महापौरांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.