मुंबई : मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून जमिनी हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रिया सुरु आहे.
जमिनीच्या मोबदल्याचे पैसे आठ दिवसात बँक खात्यात जमा होतील, असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे.
काही ठिकाणी पुलांचं कामही सुरु झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं.
तरी मोबदला न मिळाल्यानं नाराजी होती. त्यामुळे आता खासदारांनी आश्वासन दिल्याने पैसे जमा होतील अशी नागरिकांना आशा आहे.