नेमाडे यांना ज्ञानपीठ हा मराठी साहित्याचा सन्मान : मुख्यमंत्री

मराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङमयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत  महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले 

Updated: Feb 6, 2015, 07:12 PM IST
नेमाडे यांना ज्ञानपीठ हा मराठी साहित्याचा सन्मान : मुख्यमंत्री title=

मुंबई : मराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङमयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत  महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले 

नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, नेमाडे यांच्या ‘कोसला’ या  कादंबरीने पारंपरिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून काढत नवा स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह निर्माण केला. आशय व अविष्कार या दोहोंबाबतीत समृद्ध असलेल्या या कादंबरीचे गारूड आजही तरूण वाचकांच्या मनावर कायम आहे.  त्यांच्या हिंदू, बिढार, जरीला, झूल, हूल आदी कादंबऱ्यांना महाकाव्याचे परिमाण लाभले आहे. 

कादंबरीकार, कवी, समीक्षक अशा विविध भूमिकेत नेमाडे यांनी लेखणीने सशक्त लिखाण केले. त्यांचा गौरव हा जणू मराठी साहित्याचाच गौरव आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.