मुख्यमंत्र्यांचं शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 6, 2013, 09:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
शिवसेनेने विरोध केला तरी मुंबईत एलबीटी लागू होणारच, अशीही ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दरम्यान एलबीटी बाबत एक समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यात ४ सरकारी आणि ४ व्यापा-यांचे प्रतिनिधी असणार आहेत. चर्चेनंतर एलबीटी मधील बदलाबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पावसाळी अधिवेशनात सुधारणा विधेयक मंजूर करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलंय.

याशिवाय म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी कराव्यात यासाठी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. तसचं म्हाडा आणि एमएमआरडीएच्या कामांवरुन टीका करत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. आता मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची ही मागणी फेटाळली आहे.