www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय... महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलय... त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलय... त्यांच्या दाव्यानुसार राज्यात 18 चीटफंड कंपन्यांनी हा घोटाळा केलाय.
ट्रीपल एन इंडिया डॉट इन नावाची चिट फंड कंपनी अग्रेसर असल्याचा त्यांनी आरोप केलाय. या कंपन्या तीन ते सहा महिन्यात दाम दुप्पटच्या योजना आणून सर्वसामान्यांना लुटतायेत. सध्या या चीट फंड कंपन्यांचे 22 हजार एजंट राज्यात आहेत. या कंपन्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाताशी धरुन हा गोरखधंदा सुरु केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
महाराष्ट्राच्या इकोनॉमिक्स ऑफेन्स विंगचे आयएएस अधिकारी या चीट फंड कंपन्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी तोडपाणी करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते यांची या सेटलमेंटमध्ये फिप्टी-फिप्टी पार्टनरशिप असल्याचं त्यांनी सांगितलय.