मुंबई : राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता काँग्रेस नेत्याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंग यांची संपत्ती जप्त करण्यास आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाला परवानगी दिल्याचे आहे, असे समजते. त्यामुळे कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.
कृपाशंकर सिंग यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबाने उत्पन्न स्रोतापेक्षा 19.95 टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा आरोप करण्यात आलाय.