मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 

Updated: Feb 12, 2016, 10:54 PM IST
मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल title=

मुंबई: या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 

कर्जत स्टेशनवर गर्डर्स टाकण्यात येणार आहेत, त्यामुळे सकाळी 11.20 ते 3.20 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.  

या ब्लॉकमुळे चेन्नई-सीएसटी आणि कोईंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी लोणावळ्याच्या आधीच्या स्टेशनवर थांबवण्यात येईल. या दोन्ही गाड्या संध्याकाळी पाच वाजता मुंबईला पोहोचतील. 

तर 15 तारखेला सीएसटी-चेन्नई एक्स्प्रेस मुंबईहून पावणेबारा वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनस-कोईंबतूर रात्री 10.35 मिनीटांनी सुटेल. सीएसटी-नागरकोईल एक्स्प्रेस, सीएसटी हैदराबाद एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-काकिनाडा एक्स्प्रेस या गाड्या पुण्यात एक ते दीड तास उशीरा पोहोचणार आहेत.