'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली

महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. 

Updated: Feb 3, 2015, 01:32 PM IST
'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली title=

मुंबई : महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. 

गाण्यातून 'बॉम्बे' हा शब्द वगळण्यात यावा, असा आदेश या गाण्याचा गायक मिहिर जोशी यांना भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डानं आदेश दिलाय. 

1995 पर्यंत मुंबईचा उल्लेख बहुदा बॉम्बे म्हणूनच व्हायचा... पण, काही संघटनांच्या जोरदार अभियानानंतर 'बॉम्बे'चं नाव बदलून मुंबई करण्यात आलं होतं.

जोशी यांनी गेल्या वर्षी आपला 'मुंबई ब्लूज' हा अल्बम प्रदर्शित केला होता. यातील एका गाण्यावर व्हिडिओ बनविण्याची परवानगी नुकतीच एका एन्टरटेन्मेंट कंपनीनं सेन्सॉरकडे मागितली होती. यावेळी, या गाण्याला परवानगी तर मिळाली पण, या गाण्यातून 'बॉम्बे' या शब्दाच्या ऐवजी 'बीप' वापरला जावा, असं सेन्सॉर बोर्डानं म्हटलंय.

सोशल वेबसाईटवर मात्र सेन्सॉरच्या या आदेशाची चांगलीच खिल्ली उडवण्यात येतेय. #Bombay हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर जोरदार सुरू आहे. 

ट्विटरवर उमटलेल्या या काही प्रतिक्रिया... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.