शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.  

Updated: Sep 18, 2015, 08:51 PM IST
शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार title=

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.  

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्शी यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिलीय. १० दिवसांपूर्वी या प्रकरणात लक्ष घालणाऱ्या पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या भूमिकेविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी हा तपास मारियाच पाहतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं. ८ सप्टेंबर रोजी राकेश मारिया यांची हकालपट्टी करत त्यांच्या पदावर अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी हा वाद उत्पन्न झाला होता. 

'सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क केलाय. राज्य सरकारनं केंद्राच्या निर्णयाला होकार दर्शवला आहे' असं बक्शी यांनी म्हटलंय. 

शीना बोरा हिची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शीनाची आई आणि मीडिया जगतातील प्रसिद्ध बिझनेसमन पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला अटक करण्यात आलेली आहे. इंद्राणीची साथ देणारा तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि कार चालक श्यामवर राय यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.