www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
मुंबईत पैशाने भरलेले चार ट्रक पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही रक्कम करोडांच्या घरात आहे. एवढा पैसा आला कोठून, कोण आहे हा कुबेर? याची चर्चा सुरू झालेय.
तब्बल १५० बॅगांमध्ये अडीज हजार कोटी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे पैसे चार ट्रकमधून आणण्यात आले होते. हे पैसे रात्रभर मोजण्यात येत आहेत. जवळपास १०० लोक ट्रकमधील पैसे मोजत आहेत.
मुंबई सेंट्रल स्थानकावर एनआयए आणि आयकर खात्यानं मध्यरात्रीनंतर केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आलेत. सुमारे आडीच हजार कोटी रुपये गुजरात मेलनं गुजरातेत पाठवले जाणार असल्याची टीप एनआयएला मिळाली होती. त्यावरून सुमारे १०० अधिका-यांसह मुंबई सेंट्रलला सापळा रचण्यात आला.
चार ट्रकमध्ये सुमारे दीडशे बॅगांमध्ये ही रोख रक्कम आणि दागिने भरण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी ४७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नोटा मोजण्याचं काम सुरू असून ही रक्कम नेमकी किती होती, ते त्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. हे पैसे कोण कोणाला पाठवत होतं, या दिशेनंही तपास सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.