मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राज्य मंत्रीमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिलीय. पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून अशा कायद्याची मागणी करण्यात येत होती.
अखेर सरकारनं या विधेयकाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन यादिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. झी २४ तासनं हा मुद्दा लावून धरला होता. तसंच झी २४ तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगु़डकर आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची गेल्या आठवड्यात भेटही घेतली होती.