मुंबई : रेल्वेनी कितीही सूचना दिल्या तरी काही जणं ऐकायला तयार नाहीत, अगदी ओव्हर हेड वायरवर एकाने सू केल्याने तो ५० टक्के भाजला आहे. हा १४ वर्षाचा मुलगा आहे, १६ जानेवारीला दुपारी ४ वाजता ही घटना माहीममध्ये घडली.
हुसेन सलीम खान हा मुलगा दुपारी माहीमच्या पुलावरून चालला होता. पुलावर आल्यानंतर तो सू करू लागला. यावेळी त्याच्या सू चा संबंध थेट ओव्हरहेड वायरशी आला. या घटनेत तो ५० टक्के भाजला. त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
हुसेनवर सध्या सायनच्या सर्जिकल विभागात उपचार सुरू आहे. 'या घटनेत हुसेन ५० टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. या घटनेमुळे त्याच्या प्रजनन क्षमेतेवरही कायमचा विपरीत परिणाम होईल', अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.