केवळ बनावट नोटा बाळगणं हा गुन्हा नाही - हायकोर्ट

केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

Updated: May 29, 2015, 06:40 PM IST
केवळ बनावट नोटा बाळगणं हा गुन्हा नाही - हायकोर्ट  title=

मुंबई : केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

एका आरोपीला मुक्त करताना 'केवळ खोट्या नोटा बाळगणं हा गुन्हा ठरू शकत नाही', असं मत हायकोर्टानं नोंदवलंय. सदर व्यक्तिला नोटा बनावट आहेत हे आधीपासून माहीत होतं, हे सिद्ध होणं गरजेचं असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. 

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी मुन्शी मोहम्मद शेख याला २०१३ मध्ये सत्र न्यायालयानं दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवत आरोपीची निर्दोष मुक्तता केलीय. 

शेख यांनी पंजाब नॅशनल बॅंकेच्या कुर्ला शाखेत साडे नऊ हजार रूपये भरण्यासाठी आणले होते. मात्र,  कॅशियरला संशय आल्याने त्याने ही रक्कम मॅनेजरकडे नेली. मॅनेजरने नोटा खोट्या असल्याचं सांगितलं. दरम्यान, शेख बँकेतून पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शेख याला अटक करत त्याच्यावर खटला सुरु होता.

परंतु शेख याला आधीपासून नोटा बनावट असल्याची माहिती होती, असा एकही साक्षी पुरावा सरकारी पक्षाला सापडला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.