ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच निधनं झालंय. 

Updated: Dec 25, 2015, 04:58 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन title=

मुंबई : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच निधनं झालंय. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या कॅन्सरने ग्रस्त होत्या. 

मेरा साया, वो कौन थी आणि वक्त हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. तसेच हम दोनो, असली नकली, एक फूल दो माली, मेरे मेहबूब या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. 

१९५८ मध्ये त्यांनी अबाना हा पहिला चित्रपट केला. यात त्यांनी शीला रामानी यांच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी इंतकाम, एक फूल दो माली (१९६९) आणि गीता मेरे नाम (१९७४) या गाजलेल्या सिनेमात काम केलं. हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शितही केले होते.