www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिका डेंग्युची शिकार झाली आहे. पालिकेचे ३० ड्रायव्हर आणि ४ डॉक्टर डेग्युमुळे आजारी पडल्याचं धक्कादाय वास्तव समोर आलंय. आश्चर्याची बाब म्हणजे पालिका आयुक्त आणि मुंबईच्या महापौराना कर्मचा-यांच्या आजारविषयी काहीच माहित नाही.
मुंबई महापालिकेच्या अकार्यक्षमतेचा फटका त्यांच्याच कर्मचा-यांना बसल्याचा उघड झालंय.. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे चार डाक्टर केईएम रूग्णालयात डेग्युचे उपचार घेत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय. इतकंच नाही तर महापालिकेचे 30 ड्रायव्हर डेंग्यूची लागण झाल्यानं कामावर येत नाहीयेत. पालिकेच्या वरळी गॅरेजमध्ये घाणीच साम्राज्य पसरलंय. अस्वच्छतेमुळे गॅरेजमध्ये काम करणा-या 30 चालकांना डेंग्यूची लागण झालीय. मुंबईकरांना चकाचक मुंबईच स्वप्न दाखवणा-या पालिकेच्या अधिका-यांना स्वत:च्या कर्मचा-याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने ते जनतेच्या आरोग्याचे प्रश्न काय सोडवतील अशी टीका आता होऊ लागलीय.
मुंबई महापालिकेत राहणा-या ६० टक्के घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्याच पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मुंबईकराना स्वच्छतेचे धड़े देणारी पालिका त्यांच्याच अधिका-यांना आणि कर्म-यांना झालेल्या डेंग्यूमळे नागरिकांच्या आरोग्याबाबत किती जागृत असणार हे वेगळ सांगायला नको.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.