मुंबई : मुंबई महापालिकेत कोणतीही समितीची आणि महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
नगरसेवकांच्या दबावामुळं भाजपनं प्रभाग समिती निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. जिथे संख्याबळ जास्त त्या प्रभाग समितीत निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी दिलेल्या माहितीनुसार, संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार... मात्र, कुणाकडेही मदत मागणार नाही आणि कुणालाही मदत देणार नाही.
त्यामुळे ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे बहुमत नसेल त्याठिकाणी सेना- भाजप एकमेकांना मदत करणार का? हा प्रश्न आहे.