मुंबई : सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज होत आहे. मात्र संधी मिळताच एकमेकांवर वार करणा-या या मित्रांच्या जखमांवर समन्वय समिती मलमपट्टी करू शकेल का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याशिवाय सरकारी समित्या आणि महामंडळांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे. सरकारमध्ये खात्यांचे वाटप झाले, तोच फॉर्म्युला महामंडळ नियुक्त्यांमध्ये असावा असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे समन्वय समितीची नवी उपाययोजना कितपत यशस्वी होईल, ही शंकाच आहे.
भाजप-शिवसेना मंत्र्यांमध्ये जाहीररित्या टीका टीपन्नी होत होती. मंत्र्यांची नाराजी ही मीडियासमोर उघड होत होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील उघड उघड नाराजी दिसत होती. सरकारमधील धूसफुस सातत्याने पुढे येत असल्याने युती सरकारची प्रतिमा खराब होत होती. त्यामुळे भाजप-शिवसेना यांनी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेत समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.