मुंबई : भाजप आणि शिवसेनेमधील विसंवाद दिवसागणिक वाढतच चाललाय. सरकारमध्ये सहभागी असलेल्या युतीतले वाद मिटवण्यासाठी समन्वय समितीची पहिलीच बैठक पार पडली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही.
भाजप शिवसनेनेची समन्वय समितीची पहिलीच बैठक कोणत्याही तोडग्याविनाच संपली. या बैठकीत महामंडळ नियुक्तीं संदर्भात निर्णय झाला नाही. दरम्यान चार मार्चला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती, भाजप प्रदेशाध्यक्ष राबसाहेब दानवे यांनी दिलीय. तर पंधरा दिवसांनी पुन्हा समन्वय समितीची बैठक होणार आहे.
समन्वय समितीची पहिलीच बैठक कोणत्याही तोडग्याविनाच संपली. हे कमी झालं म्हणून की काय, भूमी अधिग्रहण कायद्याला शिवसेनेनं विरोध केलाय. यासंदर्भातली एनडीएच्या बैठकीला शिवसेनेनं दांडी मारली. दरम्यान, मुंबईचा विकास भाजपच करणार, असं सांगून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.
शिवसेना-भाजपामधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या आरे कॉलनीच्या विकासाच्या मुद्यावर भाजपने शिवसेनेला चांगलंच टार्गेट केलं आहे. मुंबईचा विकास आणि मुंबईकरांना खरा न्याय भाजप आणि भाजपचे मुख्यमंत्रीच देऊ शकतात, असा ठाम दावा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.