मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी उत्तर भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेल्या "चोखा बाटी" पदार्थाची मदत घेण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्री के साथ संवाद, बाटी चोखा के साथ या नावानं मुंबईत कार्यक्रम होत आहे. यावेळी सुमारे 5 हजार उत्तर भारतीयांना देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
दुसरीकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षात अंतर्गत राजकारणही सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. अलिकडेच भाजपामध्ये येऊन विधान परिषदचे आमदार झालेले आर. एन. सिंह यांच्याविरोधात पक्षातल्या उत्तर भारतीयांचा एक मोठा गट आहे. या गटानं चोखा बाटी कार्यक्रम घेऊन सिंह यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं आहे.