भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ

महापालिका निवडणूकीत भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतो आहे. हुतात्मा चौकात दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महापालिका प्रचाराचा नारळ फुटेल. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर इथं सभा होईल.

Updated: Feb 5, 2017, 08:29 AM IST
भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ title=

मुंबई : महापालिका निवडणूकीत भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतो आहे. हुतात्मा चौकात दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महापालिका प्रचाराचा नारळ फुटेल. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर इथं सभा होईल.

गेल्या 20 वर्षांत भाजपा मुंबई महापालिका प्रथमच स्वबळावर लढवत आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला मुंबई महापालिकेची सत्ताही मिळवायची आहे. त्यासाठी पक्ष आपली सगळी शक्ती पणाला लावतो आहे.