मलिकांना न हटविल्यास रस्त्यावर उतरू - सेना, काँग्रेसवर भाजपची टीका

महाराष्ट्र सदन नित्कृष्ट जेवण प्रकरणी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिलाय. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.

Updated: Jul 26, 2014, 11:49 PM IST
मलिकांना न हटविल्यास रस्त्यावर उतरू - सेना, काँग्रेसवर भाजपची टीका title=

मुंबई : महाराष्ट्र सदन नित्कृष्ट जेवण प्रकरणी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिलाय. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.

दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एक दिवसही राहात नाहीत. त्याऐवजी पीएमओ असताना त्यांना जो बंगला मिळाला होता त्यात ते अजूनही अवैधरित्या राहात आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी आज केला. महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री स्वतः किंवा शरद पवार, नारायण राणे कोणीही नेता एक रात्रही राहीलेले नाहीत, त्यामुळे तिथल्या गैरसोयी त्यांना माहित नाहीत असं सोमय्या म्हणाले.

आज मुंबई पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले. तसंच महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातही दोष आढळले आहेत. सदनाचं बांधकाम थर्ड पार्टी ऑडीटकडून करण्यात यावं असं समितीने सांगितलं होतं. तसंच बांधकामात त्रुटी ठेवणा-या कंत्राटदारावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश होते पण ते झाले नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.