वांद्रेत रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीला भीषण आग

 वांद्र्यातल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आग विझवण्यात यश आलंय.

Updated: Apr 25, 2015, 10:48 PM IST
वांद्रेत रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीला  भीषण आग title=

मुंबई : वांद्र्यातल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आग विझवण्यात यश आलंय.

वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या या झोपडपट्टीत अग्नितांडव पाहायला मिळालं. हा परिसर स्टेशन नजीक असल्यानं आगीचा परिणाम लोकल वाहतुकीवरही झाला. काही काळ लोकल गाड्या बंद ठेवण्यात आल्या.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 बंब गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.