विधानसभेत सन्माननीय कुत्र्यावर हास्यकल्लोळ

विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना चावणारा कुत्रा हा सन्माननीय असल्याचा उल्लेख केल्याने एकच हशा पिकला.

Updated: Apr 9, 2015, 02:50 PM IST
विधानसभेत सन्माननीय कुत्र्यावर हास्यकल्लोळ title=

मुंबई : विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना चावणारा कुत्रा हा सन्माननीय असल्याचा उल्लेख केल्याने एकच हशा पिकला.

आमदार महादेव जानकर यांना कुत्रा चावल्यानंतर अँन्टी रेबीज लस उपलब्ध झाली नसल्याप्रकरणी आज विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. 

या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी कुत्र्याचा उल्लेख सन्माननीय कुत्रा असा केल्यानं विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उठला. 

आमदारांना चावलेला कुत्र्याला सन्माननीयच म्हटलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनीही प्राण्यांबाबत आदराची भावना बाळगणे गैर नसल्याचे सांगत यावर कोटी केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.