मुंबई : वांद्रे बॅन्डस्टँड येथे समुद्रात बुडालेल्या तिन मुलींना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेणारे रमेश वाळुंज त्यांच्या कुटूंबीयांची मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी भेट घेत सांत्वन केलं.
वाळुंज यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी, तसेच वाळुंज यांच्या पत्नीला नोकरी देण्याची जबाबदारी खासदार पूनम महाजन आणि आपण घेऊ असे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
बँड स्टँड समुद्राजवळ सेल्फी काढत असताना तीन तरुणी समुद्रात बुडाल्या. यावेळी वाळुंज यांनी तात्काळ धाव घेत तीनपैकी दोन मुलींचा जीव वाचवला. वाळुंज यांना स्वत:ला वाचवू शकले नाहीत. अद्यापही ते आणि तिसरी तरुणी बेपत्ता असून शोध सुरु आहे.