असवुद्दीन ओवैसीनं सलमानला म्हटलं 'बेवडा'!

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमी (एमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर जाहीर भाषणात निशाणा साधलाय. इतकंच नाही तर त्यांनी सलमानचा उल्लेख 'वेबडा' म्हणूनही केलाय. 

Updated: Apr 6, 2015, 01:57 PM IST
असवुद्दीन ओवैसीनं सलमानला म्हटलं 'बेवडा'! title=

मुंबई : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमी (एमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर जाहीर भाषणात निशाणा साधलाय. इतकंच नाही तर त्यांनी सलमानचा उल्लेख 'वेबडा' म्हणूनही केलाय. 

अप्रत्यक्षपणे सलमानवर निशाणा साधताना ओवैसी यांनी 'एका बेवड्यानं दारू पिऊन गाडी फुटपाथवर चढवली... यात एका निरापराध व्यक्तीचा जीव गेला आणि आत्ता त्याला जाणवतंय की त्यांनी गाडी चालवलीच नव्हती... आणि त्यानं एका गरीब बिचाऱ्या ड्रायव्हरला फसवलंय'. 

वांद्र्यातील पोटनिवडणुकीच्या पार्श्मभूमीवर ओवैसी यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुंबईत एक जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते... आणि याच दरम्यान त्यांनी अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला. 

'महाराष्ट्रात गोमांसवर बंदी आणली जाते तर दारुवर का नाही? जर दारूवर बंदी आणली गेली तर अनेक अपघात रोखले गेले असते... अनेक घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते' असं म्हणत त्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला.

वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नीला तिकीट दिलंय तर काँग्रेसक़डून नारायण राणे आपलं नशीब आजमावून पाहतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.