वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा आणखी एक घोळ

यावरून खासगी संस्था आणि सरकारचे साटेलोटे ? तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Updated: Sep 22, 2016, 04:38 PM IST
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा आणखी एक घोळ  title=

मुंबई : सीईटीची तिसरी यादी जाहीर न करताच खासगीचे प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येतंय, यावरून खासगी संस्था आणि सरकारचे साटेलोटे ? तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे सीईटी म्हणजेच सरकारी जागांमधील तिसऱ्या यादीत नंबर लागला तर पुन्हा खासगीमधील प्रवेश त्या विद्यार्थ्यांना रद्द करावा लागणार. 

खासगीमध्ये त्यामुळे ६० हून अधिक जागा रिक्त होणार ज्या संस्थाच भरणार. त्यामुळे सरकारी तिसरी यादी वेळेत आली असती तर संस्थांकडे जागा गेल्या नसत्या. त्यामुळे यामागे गौडबंगाल असल्याचा आरोप पालक करत आहेत.