आज अंगारकी चतुर्थी, घ्या लालबागच्या राजाचे दर्शन

आज या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. यानंतर पुढील वर्षी अंगारकी चतुर्थी येणार नाही. 

Updated: Sep 1, 2015, 05:29 PM IST

घ्या लालबागच्या राजाचे मुखदर्शन... 

मुंबई : आज या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. यानंतर पुढील वर्षी अंगारकी चतुर्थी येणार नाही. 

गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही. 

आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह राज्यातील इतर सर्व गणेश मंदिरांमध्ये आज भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. 

२०१७ मध्ये मात्र, १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर रोजी अशा तीन अंगारक संकष्ट चतुर्थी येणार असल्याचं पंचांगकर्ते आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय. पुढच्या वर्षी अंगारक चतुर्थीचा एकही योग का नाही, याचं कुठलंही शास्त्रीय कारण नसल्याचं ते म्हणाले.

या महिन्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी घ्या लालबागच्या राजाचे दर्शन. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.