www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशाची राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी अमूल दूध दरात वाढ करण्यात आली होती. आता मुंबईतही आजपासून (25 एप्रिल 2014) अमूल दुधात दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अमूलचे दूध दोन रुपयांनी महाग झाले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पहिल्या किमतीपेक्षा अमूलचे दूध दोन रुपयांनी महाग झाले आहे. अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दुधांच्या किंमतीत लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत दुधाचे दर वाढले आहेत.
अमूल ब्रॅन्डचे दूध विक्री करणाऱ्या गुरजार सरकारिता दुग्न विपणन संघांकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाकडून सांगण्यात आले. आता गोल्ड दूध 46 रूपयांवरून 48 रूपये लीटर झाले आहे. तर अमूल ताजा 36 रुपयांवरून 38 रूपये झाले आहे. मुंबईत दररोज 3 लाख लीटर दूध विक्री होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.