मुंबई : कल्याण येथून एटीएसने अटक केलेल्या रिझवान खानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिझवान धर्मांतरासाठी कायदेशीर मदत करायचा असा खुलासा झाला आहे. स्वत: रिझवाननं 2015 साली अल जजीरा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली होती.
दलित, मुस्लिम नागरिकांना मदत करायचा. नाव बदलण्यासाठी, स्कुल अडमिंशनसाठी तो सत्य प्रतिज्ञापत्र बनवून देण्यासाठी मदत करत असे. त्याचप्रमाणे दलित नागरिकांचं धर्मांतर करायचा. ATS ने हा व्हिडिओ ताब्यात घेतलाय. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी कल्याण येथून आयसिसच्या हस्तकाला अटक केली होती.
पाहा व्हिडिओ