मुंबई : जर तुम्ही बँक खात्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा पुन्हा बँकेत जमा करत आहात, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची तुमच्यावर नजर असणार आहे. पॅनकार्ड डिटेल देणे टाळण्यासाठी अनेक जण बँकेत ५० हजारापेक्षा कमी रक्कम जमा करताना दिसत आहेत. मात्र बँकांची नजर आता बँकेत २५ हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर आहे.
देशातील काळापैसा नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने काही पावलं उचलली आहेत. यामुळे लोकांना रोकड मिळत नाहीय, खूप अडचणी येत आहेत, मात्र जाणकार या अर्थव्यवस्थेला योग्य देखील म्हणत आहेत. जर तुम्ही बँकेत नियमित व्यवहार करत असाल, तर हे जाणून घ्या की पॅनकार्डचे नियम खूपच बदललेले आहेत.
नोटबंदीच्या निर्णयानंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंटचा डोळा बँकेत पैसे जमा करणाऱ्यांवर आहे आता नवीन नियमानुसार ५० हजारपेक्षा जास्त किंवा अडीच लाखापेक्षा जास्त डिपॉझिटवर सरकारची नजर असणार आहे.